न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

बारामती नगरपालिका निवडणूक रंगात — प्रभाग क्रमांक १० मध्ये “सचिन जगदाळे” चर्चेच्या शिखरावर!

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती नगरपालिका निवडणूक रंगात — प्रभाग क्रमांक १० मध्ये “सचिन जगदाळे” चर्चेच्या शिखरावर!

बारामती (सह संपादक- संदिप आढाव)

बारामती ही राजकारणाची पंढरी अशी ओळखले जाते आणि हे राजकारणात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला असून, कालच निवडणूक आयोगाने नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर बारामतीत राजकारणात अक्षरशः भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, अ दर्जाच्या बारामती नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची सत्ता असली, तरी तिकीटासाठी आतून ‘चोरस’ एवढी तीव्र आहे की, कार्यकर्तेपासून नगरसेवकांपर्यंत सगळ्यांचे धडधड वाढल्या आहेत.

पण या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे ते प्रभाग क्रमांक १० वर! कारण हा प्रभाग सध्या राजकीय चर्चेचा आणि भावनांचा केंद्रबिंदू ठरला आहे.

स्थानिक पोर्टलने काही दिवसांपूर्वी एक एक्झिट पोल घेतला — आणि हाच एक्झिट पोल बारामतीत खळबळ माजवून गेला आहे. कारण हा सर्वेक्षण कोणी लावला, कशासाठी लावला, आणि कोणाच्या सूचनेवर लावला — हा प्रश्नच सध्या चर्चेत आहे.

त्या एक्झिट पोलमध्ये काय घडलं?
माजी नगरसेवक, सामाजिक कार्यात सक्रिय असलेला एनजीओ कार्यकर्ता, आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती — या सगळ्यांना मागे टाकत एक सर्वसामान्य कुटुंबातील पोलिस कर्मचाऱ्यांचा मुलगा सचिन जगदाळे यांनी आघाडी घेतली आहे!

जनतेचा कल स्पष्ट — “युवकांचा चेहरा हवा!”
सचिन जगदाळे यांनी आतापर्यंत न शोबेबाजी केली, न बॅनरबाजी. कोणतंही फोटोसेशन नाही, कोणतेही दिखाऊ कार्यक्रम नाही — फक्त आणि फक्त सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आणि त्याचं प्रत्यंतर या एक्झिट पोलमध्ये स्पष्टपणे दिसलं.

यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू — “हे खरे एक्झिट पोलचे यश नाही, तर लोकांच्या भावनेचा स्फोट आहे!”

स्थानिक राजकारणात मोठ्या नेत्यांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, आणि एनजीओ गट मागे पडले, तर एक सर्वसामान्य घरातून आलेला तरुण आघाडीवर — हेच आज चर्चेचं केंद्र.
जनतेतून आवाज उठतोय —

> “हा तर खरा लोकांचा उमेदवार! सचिन जगदाळेचं नाव टिकटासाठी निश्चित करावं!”

आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर —
अजितदादा पवार या जनतेच्या एक्झिट पोलचा विचार करतील का?
सर्वसामान्य कुटुंबातील, पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाला राष्ट्रवादीचं तिकीट देऊन ‘युवा नेतृत्वा’ला संधी देतील का?

बारामतीत सध्या एकच चर्चा घुमतेय —

> “प्रभाग क्रमांक १० मध्ये फिक्स नगरसेवक — सचिन जगदाळे!”

आणि या चर्चेमुळे बारामतीचं राजकारण नव्या समीकरणांकडे झुकताना स्पष्टपणे दिसतंय.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!