ताडेपुरा तलाव परिसरात साचलेला कचरा आणि सांडपाणी नागरिकांचा संताप!

अपनी भाषा में पढ़े! Translate

ताडेपुरा तलाव परिसरात साचलेला कचरा आणि सांडपाणी नागरिकांचा संताप!

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील तलावाजवळील परिसर सध्या दूषित पाण्याने व कचऱ्याने भरून गेल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक राहुल भास्कर कंजर यांनी अमळनेर नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

ताडेपुरा येथील तलावाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याने तलावाजवळ सांडपाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात डास, मच्छर, साप आणि इतर कीटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून, ताप, डेंग्यू, गोवर अशा विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल कंजर यांनी आपल्या अर्जात नगरपरिषदेकडे तातडीने सांडपाणी निचरा करून, परिसर स्वच्छ करण्याची आणि योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ताडेपुरा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!