राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन-भिगवण पोलीस स्टेशनं व रोटरी क्लब च्या संयुक्त विद्यमाने एकता दौड ला भिगवणकरांनी उस्फुर्त प्रतिसाद

(निलेश गायकवाड)
भिगवण (प्रतिनिधी) जि. पुणे : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पोलिस ठाणे भिगवण व रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने “एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी आज दि. 31 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 7 वा या प्रसंगी भिगवण करणी उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवाला. या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य, एकोपा आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे हे होते.
ही एकता दौड दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता थोरात नगर, डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक, दिलबहार चौक, पोलीस स्टेशन या मार्गावर येथे समाप्त झाली . यामध्ये भिगवण पोलीस स्टेशन कडील अधिकारी, अंमलदार तसेच भिगवण येथील अकॅडमीचे विद्यार्थी /विदयार्थीनी शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, रोटरी क्लब ऑफ भिगवण, सायकल क्लब ऑफ भिगवण यांनी सहभाग घेत या उपक्रमातून समाजात ऐक्य आणि बंधुतेचा संदेश दिला गेला .
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अदम्य नेतृत्वामुळे देशाचे एकीकरण शक्य झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करत या दिवशी देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. त्याच परंपरेत भिगवण पोलीस स्टेशन व रोटरी क्लब भिगवण हा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांच्या मोठ्या भिगवण पोलीस स्टेशनं चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे व रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष निखिल बोगावत यांनी आभार मानले.