सायबर फसवणूक कशी होऊ शकते, कशी काळजी घेयची याची जंक्शन व सणसर येथे जनजागृती;पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांना सायबर फसवणूक होऊ नये म्हणून जंक्शन, सणसर या भागात पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांनी जनजागृती केली.
यामध्ये त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की सध्या फेसबुक मेसेज सोशल मीडिया याचा वापर करून फेसबुक अकाउंट हॅक तयार करून त्याद्वारे फॅमिली मेंबर मित्र परिवार मी अडचणीत असून मला पैशाची अत्यंत गरज आहे असा मेसेज पाठवून त्याद्वारे अकाउंट नंबर मोबाईल नंबर देऊन तात्काळ पैसे पाठविण्यास सांगून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या घडत आहे तरी सर्व नागरिकांनी सावध राहून अशा प्रकारे मेसेज वर पैसे पाठवू नये आणि आपल्या बँक खाते विषयी कोणतेही माहिती देऊ नका
तसेच काही गुन्हेगार बनावट जाहिराती बनवून नागरिकांना एसएमएस द्वारे लिंक पाठवून फसवणूक करू शकतात यासाठी खात्री केल्याशिवाय कोणतीही लिंक क्लिक करू नका यासाठी आपण सतर्क रहाणे आवश्यक आहे
आपल्या मोबाईल वर लॉटरी लागली असे सांगून खोटे फोन कॉल मेसेज येऊ शकतात असे फोन कॉल मेसेज मेसेज किंवा अज्ञात बँक खात्यावर पैसे जमा करू नका आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते
सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार बनावट ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट तयार करून ब्रॅण्डेड उत्पादनावर मोठ्या प्रमाणात सूट देऊन आपणास महत्त्व वाढून आपली फसवणूक करू शकतात
अनोळखी व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल विनंती करताना सावधगिरी बाळगा तुमचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग साठी वापरला जाऊ शकतो
तुमचा ओटीपी आणि पिन हा तुमचा फेस मास्क सारखा समजा तू इतरांसोबत शेअर करू नका
कोणालाही आपला बँक ओटीपी शेअर करू नका किंवा डेबिट क्रेडिट कार्ड क्रमांक पिन सी व्ही व्ही ओटीपी इत्यादी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नक व्हिडिओ कॉलरला प्रतिसाद म्हणजे ब्लॅकमेलिंगला आमंत्रण
वेगवेगळे स्क्रीन शेअरिंग ॲप पासून सावध रहा कारण फसवणूक करणारे तुमची गोपनीय माहिती चोरण्यासाठी त्याचा वापर करू शकतात
तुम्हाला येणारा सिक्रेट ओटीपी कोणालाही सांगू नका
अनाधिकृत ॲप्स डाऊनलोड करू नका संशयस्पद वेबसाईट आणि ॲप्स ला भेट देणे टाळा
संगणकावर नेट ब्रेकिंग वापरू नका सर्वजण वायफाय नेटवर्कवर असताना कोणतीही वैयक्तिक माहिती भरू नका आपल्या संगणकावर तसेच मोबाईलवर अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि त्यास नियमितपणे अद्यावत करा…
सदर मोहीम पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी सायबर अवेरनेस कार्यक्रम गावोगावी जनजागृती केली आहे.