बारामतीचा नामांकित उद्योजक मनोज तुपेवर बलात्काराचा गुन्हा

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीचा नामांकित उद्योजक मनोज तुपेवर बलात्काराचा गुन्हा

बारामती (सह-संपादक संदिप आढाव)
.
तरुणीला लग्नाचे व नोकरीचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध ठेवणाऱ्या एका नामांकित उद्योजकांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
एका पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मनोज कुंडलिक तुपे ( रा. ग्रीन पार्क सोसायटी विद्या प्रतिष्ठान जवळ बारामती) या नामांकित उद्योजकांवर हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडिता हि पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना उद्योजक मनोज तुपे यांच्याशी २०२१ ला ओळख झाली. मी एक मोठा बिजनेसमन असुन तुला चांगली नोकरी लावतो म्हणून जवळिक साधली.
या जवळीकतेचा फायदा घेऊन हडपसर येथील गाडीतळाजवळ गाडीतच पिडितेवर बलात्कार केला. यानंतर अनेक ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध या नराधमाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बलात्कार केला. पिडिताचा विवाह २०२२ ला झाला होता. तर २०२३ ला ती विभक्त झाली होती.
यानंतर नराधमाने तिला लग्नाचे आमिष दाखवून हरिद्वार येथे घेऊन गेला व बलात्कार केला. पिडिताने लग्नाची मागणी केल्यावर त्याने नकार देऊन तुझे उघडे नागडे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
अखेर सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत बलात्कार करणाऱ्या नराधमा विरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेमुळे बारामतीच्या उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!