राजकरानात कधी काय होईल ते सांगता येतं नाही;भिगवण शेटफळ गडे गटात स्वप्नील बंडगर यांच्या नावाची चर्चा
(निलेश गायकवाड)
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील भिगवण जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुकांच्या महत्त्वकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. हा जिल्हा परिषद गट सर्वसामान्य महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी भिगवण गण सर्वसामान्य महिलेसाठी राहिला असल्याने या दोन्ही ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
भिगवण शेटफळ गडे गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. यामध्ये अनेक नवीन चेहरे इच्छुक आहेत. काहींनी वर्षनुवर्षे तयारी चालू केली आहे.त्यामध्ये नवीन चेहरा म्हणून सामाजिक कार्यक्रम तसेच उपक्रमात राबविण्यात पुढे आलेले नाव स्वप्निल बंडगर हे नाव पुढे येऊ लागले आहे. स्वप्नील बंडगर हे उत्कृष्ट व्यावसायिक तसेच इंजिनियर देखील आहेत.इंदापूर तालुक्यातील विविध रस्त्याची कामे त्यांनी केली आहेत तसेच त्यांना सामाजिक उपक्रमात देखील हिरारीने सहभाग नोंदवला आहे. दहीहंडी, नवरात्र मोहोत्सव, महिलांसाठी विशेष उपक्रम, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम, तसेच युवकांना देखील क्रिकेट ची आवड लागावी म्हणून क्रिकेट चे सामने असे नानाविविध कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युवकांना देखील विशेष उपक्रम राबविण्यात आल्याने युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे.
त्यांचा भिगवण शेटफळ गडे गटात जनसंम्पर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांची लोकांशी जवळीकता पाहता त्यांच्याशी बोलताना त्यांनी एकदंरीत भिगवण शेटफळ गटासाठी त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकता दाखवली आहे. त्यांच्या राजकारण एन्ट्री नें राजकारण हे वेगळ्या दिशेला गेले आहे.राजकारण म्हणजे कधी कायम होईल ते सांगता येतं नाही त्यामुळे स्वप्नील बंडगर यांच्या येणाऱ्या काळातील राजकीय घडामोडी अजून कसा वेग घेतात याकडे लक्ष राहील…