मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबई च्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांकडून अटक…

@ ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांकडून बेड्या…

बारामती (सह-संपादक- संदिप आढाव)

बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात (दि.१४ सप्टेंबर) रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा फरार असून बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून ‘ब्रँड रिव्हर’ या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती
मिळाली. यानंतर, पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले. बारामती पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.
आरोपीस मीरा भाईंदर पोलीस, तुळींज पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!