प्रभाग क्रमांक 10 चे अभ्यासू उमेदवार “प्रकाश भाऊ अमृतकर -जनतेचा विश्वास, विकासाचा संकल्प!” 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 10 चे अभ्यासू उमेदवार “प्रकाश भाऊ अमृतकर -जनतेचा विश्वास, विकासाचा संकल्प!” 

 

“प्रभाग 10 मध्ये नव्या प्रकाशाचा उदय!”

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 10 मधून एक नवे पण अनुभवी नेतृत्व मैदानात उतरले आहे. श्री. प्रकाश काशिनाथ अमृतकर यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करताच परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

उच्चशिक्षित, व्यवहारकुशल आणि राजकारणाचा समृद्ध अनुभव असलेले प्रकाश भाऊ अमृतकर हे केवळ नाव नाही तर विश्वासाचे प्रतीक आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी शेतकरी आणि व्यापारी वर्गात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याशिवाय ते जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी तसेच लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सेक्रेटरी आहेत. प्रभागातील नागरिक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने म्हणत आहेत.

 “यावेळी विकासाचे नवीन पर्व सुरू करायचे असेल, तर प्रकाश भाऊंनाच संधी दिली पाहिजे!”

समाजाचे पाठबळ, तरुणांची साथ आणि मोठ्यांचा आशीर्वाद या त्रिसूत्रीवर आधारित उमेदवारी घेऊन प्रकाश भाऊ अमृतकर लवकरच प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!