प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकासाचा संकल्प — योगिता विजय पाटील यांची उमेदवारी निर्णयक
अमळनेर: विक्की जाधव.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 12 (OBC महिला प्रवर्ग) मधून योगिता विजय पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय सुपडू पाटील यांच्या अर्धांगिनी असलेल्या योगिता पाटील या समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले नाव आहे. लवकरच त्या प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी घराघरात भेट देणार आहेत.

प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत, त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार योगिता पाटील यांनी केला आहे. “प्रभाग क्रमांक 12 चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन माझ्या या प्रयत्नांना साथ द्यावी,” असे त्या म्हणाल्या.

सामाजिक कार्यकर्ते विजय सुपडू पाटील यांचा समाजकार्यातील अनुभव आणि जनसेवेचा वारसा घेऊन, योगिता विजय पाटील या प्रभाग क्रमांक 12 मधील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. प्रभागात सध्या “योगिता विजय पाटील — विकासाचा घुमतोय सूर!” अशी चर्चा रंगू लागली आहे.
