सुरंगली वाडी येथील जि.प.शाळा खोल्यांचे आ.संतोष भाऊ दानवे यांच्या हस्ते लोकार्पण.
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील
मतदार संघाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध । आमदार संतोष भाऊ दानवे । भोकरदन तालुका प्रतिनिधी। संजीव पाटील । भोकरदन तालुक्यातील सुरंगली वाडी येथील जिल्हा वार्षिक योजनेतून अठ्ठेचाळीस लाख रुपये किंमतीच्या चार शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात आले त्यांच्या लोकार्पण सोहळा काल शुक्रवारी 17 आक्टोंबर रोजी आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. आपण मतदार संघाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.संतोष दानवे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले. शिक्षण हे प्रगतीचे पाया असल्याचे सांगून या इमारतीत मुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असुन ग्रामिण भागातील शिक्षणाचा सकारात्मक बदल घडेल आणि या दृष्टीने टाकलेले पाऊल मुलांना सक्षम बनवेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे, गटशिक्षणाधिकारी अधिकारी दिलीप शहागडकर, मुख्याध्यापक,शिक्षक, अंगणवाडी सेविका आशा पाडळसे दांडगे, सुभाष दांडगे सोयगाव मंडळ अध्यक्ष दिपक सेठ जाधव, संतोष काळे, विश्वनाथ पाटील, विष्णु वर्पे, नामदेव महाराज गवळी बाबा, माजी ग्रा.प.सदस्य तुकाराम जाधव पहलवान, तुकाराम श्रीरंग जाधव , सुनील सरोदे, दत्तु पाटील पांडे, माजी सरपंच ईश्वर पाटील, सुनील सोनवणे यांच्या सह शिक्षक पालक, विद्यार्थी गावकरी उपस्थित होते.
