भिगवण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी;अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुस्क्या,१लाख किंमतीचा मुदद्माल केला हस्तगत …

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी;अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुस्क्या,१लाख किंमतीचा मुदद्माल केला हस्तगत …

(निलेश गायकवाड)

भिगवन पोलिसांच्या वतीने कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रामीण यांनी दिपावली सनाचे अनुशंगाने पोलीस स्टेशनचे हददीत सतर्क पेट्रोलींग करून मालमत्तेविरूध्दचे गुन्हयांना प्रतिबंधक करण्याचे अनुशंगाने दिलेल्या सुचना प्रमाणे

विनोद महांगडे प्रभारी अधिकारी , भिगवण पोलीस स्टेशन यांनी भिगवण पोलीस स्टेशनचे हदगीत दिनांक . 16 ऑक्टोंबर रोजी रोजी रात्रौ १ वा चे सुमारास मौजे अकोले गावचे हददीत पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , शहाजी सुद्रीक यांचेसह पेट्रोलींग करीत असताना एक इसम मोटार सायकल वरून संशईत रित्या फिरत असताना मिळुन आला . त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव गणेश गंगाधर टिंगरे , वय . ४४ वर्ष , रा . लोहार गल्ली , ता . कर्जत , जि . अहिल्यानगर , असे असल्याचे सांगितले .

त्याचे ताब्यात मिळुन अलेल्या मोटार सायकल नंबर . एम.एच .२३ / बी.ई. ७३ ९ ५ बाबत अधिक चौकशी करता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला . तो समाधान कारक माहीती देत नव्हता . त्याने सदरची मोटार सायकल ही कोठुन तरी चोरी केल्याची खात्री झाली . त्यामुळे त्यांचेवर भिगवण पोलीस स्टेशन , गुन्हा दाखल करून त्यांचे ताब्यातुन ६०,००० / – रू किंमतीची स्लेंडर मोटार सायकल गुन्हयाचे पुराव्याकामी जप्त केली .

आरोपी नामे गणेश गंगाधर टिंगरे , वय . ४४ वर्ष , रा . लोहार गल्ली , ता . कर्जत , जि . अहिल्यानगर याचेकडे अधिक विचारपुस करीत असताना त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने दिनांक . 13 ऑक्टोंबर रोजी रोजी मौजे मदनवाडी गावचे हददीतुन मदनवाडी पुलाजवळुन एक पॅजो कंपनीवी रिक्षा नंबर . एम . एच . ४२ / बी . २७८३ ही चोरी केल्याची कबुली दिली . सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन , गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले .

त्यामुळे त्यास संबंधीत गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन ४०,००० / – रू किंमतीची पॅजो कंपनीची रिक्षा नंबर . एम . एच . ४२ / बी . २७८३ ही गुन्हयाचे पुराव्याकानी जप्त केली आहे . तसेच आरोपी गणेश गंगाधर टिंगरे यांचे ताब्यात मिळुन आलेली मोटार सायकल नंबर . एम . एच . २३ / बी.ई . ७३ ९ ५ ही मिरजगाव येथुन चोरी केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असुन सदर बाबत मिरजगाव पोलीस स्टेशन , जि . अहिल्यानगर , गुन्हा दाखल असल्याचे निष्पन झाले .

सदरची कामगिरी मा . संदीप सिंह गिल्ल सो , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे ग्रामीण , डॉ सुदर्शन राठोड , उपविभागीय पोलीस अधीकारी , बारामती विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे , सहा . पोलीस निरीक्षक , भिगवण पो.स्टेचे पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , शहाजी सुद्रीक यांनी केली आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!