
अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्रमांक 18 मध्ये शशिकला महाजन यांचा विजयाचा सूर घुमतोय!
अमळनेर : विक्की जाधव.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 – 2030 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 (ब) महिला राखीव या मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली असून, या प्रभागातून शशिकला सुभाष महाजन या उमेदवारीच्या चर्चेत अग्रस्थानी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इंजिनिअर आकाश डी. माळी यांच्या आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकला ताई महाजन या स्थानिक विकासासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांपैकी एक मानल्या जातात. पाणी, लाईट, घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न — या साऱ्यांवर ठोस भूमिका घेणाऱ्या शशिकला ताईंविषयी जनतेत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात असून, “यावेळी प्रभागाचा खरा विकास साधायचा असेल तर शशिकला ताईंच्या हातीच कमान द्यावी” असा सूर नागरिकांच्या चर्चेतून उमटतो आहे. स्थानिक पातळीवर “प्रभाग क्रमांक 18 च्या फिक्स नगरसेवक” म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असून, त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि कार्यशीलतेचा ठसा नागरिकांच्या मनावर उमटलेला आहे. जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास यांची जोड घेऊन शशिकला सुभाष महाजन या प्रभाग क्रमांक 18 मधून नगरसेवकपदी विजयी होतील असा विश्वास निर्माण होतोय.
तयार आहे अमळनेर — एका सक्षम आणि संवेदनशील महिला नेतृत्वाला संधी देण्यासाठी!
