प्रताप महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार — विद्यार्थ्यांना दिला कायद्याचा सखोल परिचय

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात पार  विद्यार्थ्यांना दिला कायद्याचा सखोल परिचय

 

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे तालुका विधी सेवा समिती, वकील संघ अमळनेर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अँटी रॅगिंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित या शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. प्रवीण पी. देशपांडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते ॲड. आर. व्ही. निकम, ॲड. किशोर बागुल आणि ॲड. किरण पाटील यांनी सायबर गुन्हे, लैंगिक छळ प्रतिबंधक कायदे आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

विशेषतः विद्यार्थिनींनी ऑनलाईन फसवणूक, संशयास्पद संपर्क आणि छळाच्या घटनांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सतर्क राहावे, तसेच अशा घटनांची वेळेत तक्रार करावी, असा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश वक्त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना महाव

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!