June 30, 2025 9:14 am

युक्रेनमधल्या इंटर्नशिप अर्धवट सोडावी लागलेल्या वैद्यकीय पदवीधरांना ती भारतात पूर्ण करण्याची संधी

अपनी भाषा में पढ़े! Translate

युक्रेनमधल्या इंटर्नशिप अर्धवट सोडावी लागलेल्या वैद्यकीय पदवीधरांना ती भारतात पूर्ण करण्याची संधी

युक्रेनमधे उद्भवलेल्या युद्ध परिस्थितीमुळे इंटर्नशिप म्हणजेच अनिवार्य निवासी सेवा अर्धवट सोडावी लागलेल्या वैद्यकीय पदवीधरांना ती भारतात पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय / आयुर्विज्ञान आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, परदेशात वैद्यकीय पदवी मिळालेल्या अनेकांना युद्धस्थिती अथवा कोविड महामारी या अपरिहार्य कारणांमुळे इंटर्नशिप पूर्ण करता आलेली नाही, असं निदर्शनास आलं आहे.

निवासी सेवेचा उर्वरित कालावधी भारतात पूर्ण करण्याचा अर्ज त्यांनी केल्यास तो ग्राह्य मानण्यात येईल. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असल्याची खातरजमा करुन घेऊन राज्यांच्या वैद्यकीय मंडळांनी पुढची कारवाई करावी असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!