न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शताब्दी वर्षात संघाचा उत्साही विजयादशमी उत्सव

अपनी भाषा में पढ़े! Translate

शताब्दी वर्षात संघाचा उत्साही विजयादशमी उत्सव

 

अमळनेर : विक्की जाधव.

विजयादशमी उत्सव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक असून, यंदाही अमळनेर तालुक्यात भव्य पथसंचलन काढण्यात आले. संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येणार असल्याची माहिती संघ पदाधिकाऱ्यांनी दिली. म्हस्कर प्लॉट येथून सुरू झालेले हे पथसंचलन नेताजी सुभाष चौक, तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक मार्गे स्टेशन रोड होत पुन्हा म्हस्कर प्लॉट येथे परतले. या वेळी तिनशेहून अधिक स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते तर मंगलवेशात देखील अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. संचलनाचे शिस्तबद्ध स्वरूप आणि घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला.

संचलनाचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मार्गात फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले. या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरातील विजयादशमी उत्सव ऐतिहासिक ठरल्याचे जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!