न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

इंदापूर पश्चिम मंडळ सरचिटणीसपदी आप्पासाहेब गायकवाड यांची नियुक्ती – नियुक्तीपत्र सोहळा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर पश्चिम मंडळ सरचिटणीसपदी आप्पासाहेब गायकवाड यांची नियुक्ती – नियुक्तीपत्र सोहळा उत्साहात संपन्न

(निलेश गायकवाड)

भिगवण दि.1 भारतीय जनता पार्टी इंदापूर पश्चिम मंडळ सरचिटणीसपदी आप्पासाहेब शंकरराव गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी राधिका मंगल कार्यालय, इंदापूर येथे आयोजित “Next जनरेशन GST संमेलन, कार्यकर्ता संवाद व नियुक्तीपत्र वाटप सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे मा. सभापती प्रविण माने, भाजप पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, मयूरसिंह पाटील यांच्या शुभहस्ते आप्पासाहेब गायकवाड यांना सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माऊली चवरे, मारुती वणवे, सदानंद शिरदाळे, आकाश कांबळे, गजानन वाकसे, नानासाहेब शेंडे, प्रविणकुमार शहा, तानाजी थोरात, बाळासाहेब पानसरे, सचिन आरडे, माऊली वाघमोडे, तेजस देवकाते, राम आसबे, राजकुमार जठार, किरण गाणबोटे आदी मान्यवरांसह विविध जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आप्पासाहेब गायकवाड यांना मार्केट कमिटीचे माजी संचालक स्व. शंकरअण्णा गायकवाड यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे नेत त्यांनी परिवर्तन युवा फाउंडेशनच्या माध्यमातून भिगवण व परिसरात वृक्षारोपणाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक भान जपणाऱ्या या नेतृत्वाने २०२१ साली भिगवण ग्रामपंचायत कारभारातील मुस्लिम दफनभूमी रोड, घनकचरा व्यवस्थापन कथित घोटाळ्यांविरोधात धाडसी आवाज उठवून ग्रामस्थांचे लक्ष वेधले. ग्रामपंचायतीला जेरीस आणण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि ग्रामपंचायत कारभाराला नवे, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त वळण देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

भ्रष्टाचारविरोधी आणि निवडणूक तयारी
विधानसभा निवडणुकीत आप्पासाहेब गायकवाड यांनी प्रवीण माने यांचे कट्टर समर्थक व विश्वासू सहकारी म्हणून काम केले आहे. या बैठकीत प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद तसेच पदवीधर मतदार संघ निवडणुकांची रणधुमाळी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून पक्षाची ध्येयधोरणे व मोदींच्या विकसित भारत या स्वप्नाची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना समजावले.

भविष्यातील योजनांबाबत संदेश
गायकवाड यांनी सांगितले की, “पक्षाच्या धोरणांचा प्रचार–प्रसार गावागावात पोहोचवणे तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संघटनाला नवे बळ देण्यावर विशेष भर देणार आहे”.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेजस देवकाते (अध्यक्ष, भाजप इंदापूर पश्चिम), रामभाऊ आसबे (अध्यक्ष, भाजप इंदापूर पूर्व), राजाभाऊ जठार (अध्यक्ष, भाजप इंदापूर मध्य) व किरण गाणबोटे (अध्यक्ष, भाजप इंदापूर शहर) यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!