न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

अमळनेरमध्ये कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान 

 

अमळनेर : विक्की जाधव.

आर. के. नगर, मातोश्री नगर येथे कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सोहळा दिनांक ६ ऑक्टोबरपासून ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पार पडणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांची परिपूर्ण रूपरेषा आखण्यात आली आहे. मिरवणुका, पूजन विधी, हवन व महाप्रसाद या सर्वांमुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार आहे.

सोहळ्याचा पहिला दिवस म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी संत सखाराम महाराज वाडीपासून भव्य मिरवणुकीने सुरुवात होईल. वाजतगाजत निघणारी ही मिरवणूक राजहोडी चौक, झामी चौक, वडचौक, शिरूड नाका, सुरभी कॉलनी मार्गे धुळे रोडवरून मातोश्री नगर मंदिरापर्यंत पोहोचेल. दुसऱ्या दिवशी अखंड ज्योत पिळोदा येथील चामुंडा माता मंदिरातून आणली जाणार असून, प्रधान संकल्प, गणपती पूजन, नवग्रह-रुद्रादी मंडल स्थापन, हवन व स्नपणासह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी प्रांत पूजन, उत्तरांग हवनानंतर सकाळी ११ वाजता कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होईल. या सोबतच बलिदान, पूर्ण आहुती, दान संकल्प, आरती व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या महापुण्यकर्मात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चामुंडा माता मंदिर निर्माण समिती व पंच मंडळ कार्यकारिणीने केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!