न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

गुजरात पाठ्यक्रमातील यशानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही संत गाडगे महाराज पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करावा – सीमाताई रंधे

अपनी भाषा में पढ़े! Translate

 गुजरात पाठ्यक्रमातील यशानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही संत गाडगे महाराज पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करावा – सीमाताई रंधे 

शिरपूर, दि. ०२ ऑक्टोबर २०२५ : गुजरात राज्यातील इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकात प्रा. रजनीताई लुंगसे यांचा ‘संत गाडगे महाराज’ हा मानवसेवायोगी पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल अभिमान व्यक्त करताना, परीट समाज भगिनी शिरपूरच्या महिला अध्यक्ष सौ. सीमाताई रंधे यांनी महाराष्ट्र सरकारकडेही असा पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. संत गाडगे महाराजांच्या समाजसुधारणा, स्वच्छता आणि मानवतेच्या कार्याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळावी, म्हणून हा पाठ महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळवावा, असा त्यांचा ठाम आग्रह आहे.संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत, कीर्तनकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, अनाथ आणि दुर्बल घटकांसाठी आश्रमशाळा व धर्मशाळा स्थापन करण्यासारखे क्रांतिकारी कार्य केले. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ असे संबोधले आहे. प्रा. रजनीताई लुंगसे यांनी लिहिलेल्या या पाठाने गुजरातमधील विद्यार्थ्यांना संतांच्या जीवनकार्याची प्रेरणा मिळत असून, आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही ही संधी मिळावी, असे सौ. रंधे यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर परीट समाज भगिनी शिरपूरच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात सौ. सीमाताई रंधे आणि सर्व पदाधिकारी भगिनींनी प्रा. रजनीताई लुंगसे यांचा सन्मान केला होता. गुजरात शासन, अभ्यासक्रम मंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानताना, सौ. रंधे यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडेही या पाठाच्या समावेशाबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय, प्रा. रजनीताई लुंगसे यांचे सामाजिक-शैक्षणिक आणि अध्यात्मिक कार्य लक्षात घेऊन १९ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनात त्यांना भारत ज्योती प्रतिभासन्मान एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा त्यांचा १७ वा पुरस्कार असून, संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णाजी जगदाळे, प्रमुख श्री. राजेंद्र गोसावी आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रमेश आव्हाड यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.प्रा. रजनीताई लुंगसे यांच्या समाज प्रबोधनात्मक पुस्तकांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होत असून, परीट समाजाच्या राष्ट्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सौ. सीमाताई रंधे यांच्या या मागणीमुळे महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असून, संत गाडगे महाराजांच्या आदर्शांना अभ्यासक्रमात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!