न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला : एका आरोपीला अटक, तपास सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला : एका आरोपीला अटक, तपास सुरू

 

सोलापूर : मार्मिक न्यूज नेटवर्क

सामाजिक कार्य आणि उद्योजकतेतून राज्यभर ओळख निर्माण करणारे राणा शिपिंग कंपनीचे चेअरमन राणा सूर्यवंशी यांच्यावर सोलापूरमध्ये प्राणघातक हल्ला झाला. अक्कलकोट दर्शन करून परतत असताना त्यांच्या गाडीवर पिस्तूल व धारदार शस्त्रांनी सुसज्ज चार जणांनी हल्ला केला. बुलेरो जीपमधून आलेल्या या हल्लेखोरांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, सचिन राठोड, आकाश चव्हाण, कृष्णा पवार आणि अविनाश राठोड अशी आरोपींची नावे समोर आली आहेत.

या घटनेची नोंद अक्कलकोट पोलिसांत झाली असून, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सूर्यवंशी यांच्या गडचिरोलीतील आणि राज्यभरातील सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळेच या हल्ल्याची पार्श्वभूमी असावी. यापूर्वीही त्यांच्या सामाजिक कामातून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे.घटनेनंतर सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातून निषेधाचा सूर उमटला आहे. “राज्यात कायदा व सुव्यवस्था कोठे आहे?” असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. स्वतः राणा सूर्यवंशी यांनी मात्र आपण सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्यामागे नक्षली कलेक्शनसह इतर कारणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!