राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सव पारंपरिक पथसंचलन व उत्सव होणार साजरे
अमळनेर : विक्की जाधव.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संघाचे सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून, अमळनेर नगरातही पारंपरिक पथसंचलन व उत्सव साजरे होणार आहेत.
गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वा. म्हसकर प्लॉट, स्वामी नारायण मंदिरासमोर, स्टेशन रोड येथून पथसंचलनाची सुरुवात होणार आहे. संत सखाराम महाराज नगरचा विजयादशमी उत्सव शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायं. ६.०० वा. वाडी संस्थान पटांगण येथे होईल. या प्रसंगी डॉ. श्री. विक्रांतजी पाटील (M.D. मेडीसिन) प्रमुख पाहुणे व श्री. अनिलजी भालेराव (मा. प्रांत संघचालक, देवगिरी प्रांत) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रीमंत प्रतापशेठ नगरचा विजयादशमी उत्सव रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायं. ६.०० वा. बजरंग सुपर मार्केट समोर, प्रताप मिल कंपाऊंड येथे होईल. या कार्यक्रमात डॉ. निखीलजी बहुगुणे (M.D. मेडीसिन) प्रमुख पाहुणे तर श्री. सिध्देश्वरजी बिराजदार (धर्मजागरण प्रमुख, देवगिरी प्रांत) प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या उत्सवाच्या माध्यमातून संघ स्वयंसेवक शतकपूर्ती वर्षात सामाजिक समरसता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहेत.