न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

नाम फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक कीटचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाम फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक कीटचे वाटप
तांदुळवाडी/प्रतिनिधी:- नाम फाऊंडेशनच्या वतीने माढा तालुक्यातील सिना नदी काठावरील लव्हे,तांदुळवाडी,रिधोरे व पापनस या चार पूरग्रस्त गावांमध्ये २१ किलोच्या ५०० किटचे वाटप माढा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या किटमध्ये समावेश चहा,साखर,आटा,हरभरा, तुरदाळ,तांदूळ,मिठ, मसाले,चटणी,हळद सर्व प्रकारच्या दाळी यांसह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
यावेळी धनराज शिंदे म्हणाले की,खासापुरी,चांदणी प्रकल्प,सिना कोळेगाव धरणातून सिना नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोडलेल्या पाण्यामुळे व माढा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला प्रचंड प्रमाणावर महापूर आला असून सीना नदी काठावरील सोळा गावांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांना आपले संसार उपयोगी साहित्य जागेवर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे लागले तर कित्येकांचे संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले.पुढील दोन-तीन दिवसात आणखी एक हजार जीवनावश्यक किटचे वाटप उर्वरित नदीकाठच्या पूरग्रस्त गावांना करण्यात येणार आहे.तांदुळवाडी गावामध्ये जीवनावश्यक कीटचे वाटप केल्याबद्दल सरपंच रणजितसिंह पाटील यांनी नाम फाउंडेशन व माढा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी नाम फाउंडेशनचे बाळासाहेब शिंदे,नितीन कापसे,सुरेश बागल,ग्राम महसूल अधिकारी विकास कांगणे,ग्रामपंचायत अधिकारी रमाकांत केवटे,स्वप्निल थोरात,प्रमोद भोसले, प्रविण गवळी,नेताजी गवळी,अमोल गवळी,सागर गवळी,सुजित भोसले,विपुल भोसले,अजिनाथ कनिचे,संतोष गवळी,गणेश संपकाळ,नागनाथ जाधव, विक्रम पाटील,दिग्विजय पाटील,पंकज पाटील,धनंजय मोरे,दत्ताआबा कदम,सुमंत गवळी,अतुल गवळी,अतुल परबत,महेश माने, युवराज शिंदे,पपू बनसोडे,विजय कदम आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!