न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

पूरग्रस्त भागात रुग्णांना आरोग्य शिबिरात तपासणीसह औषधोपचार

अपनी भाषा में पढ़े! Translate

पूरग्रस्त भागात रुग्णांना आरोग्य शिबिरात तपासणीसह औषधोपचार

जवळपास १५०० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ

प्रतिनिधी: अजिनाथ कनिचे दि:२१,२२,व २५,२६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे,खासापूरी,चांदणी प्रकल्प व सिना कोळेगाव धरणातून सोडलेल्या व गेल्या आठ दिवसात तीन वेळा आलेल्या महापुराच्या प्रचंड पाण्यामुळे माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावामध्ये मोठी दाणदाण उडाली होती.तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊन अनेकांचे संसार पाण्यात गेले.शेतीचे मोठे नुकसान झाले.गाई-म्हैस,शेळी,आदी पशुधन पुराच्या पाण्यात वाहुन गेले.या कठीणप्रसंगी पुरग्रस्त ग्रामस्थांसमोर अन्नधान्य तसेच आरोग्याचा प्रश्न आवासुन उभा होता.यावेळी पुरग्रस्तांना अन्नधान्य व आरोग्य सुविधा मिळणे अत्यंत गरजचे होते.या दृष्टीकोणातुन शिवसेना सचिव संजय मशिलकर यांच्या नियोजनाखाली वैद्यकीय मदत कक्ष,मुंबई यांच्या वतीने माढा तालुक्यातील पुरग्रस्त भागात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी एकुण १५००पेक्षा अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधाचे देखील वाटप करण्यात आले आहे.
माढा तालुक्यातील रिधोरे,तांदुळवाडी,पापनस, नाडी,शिंगेवाडी,मुंगशी,लव्हे,उंदरगाव,माढा,या गावात पुरग्रस्तांसाठी दि.२७ सप्टेंबर रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,मुंबई यांच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात जवळपास १५०० पेक्षा अधिक रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.या आरोग्य शिबिरामध्ये डॉ.शशिकांत त्रिंबके, डॉ.हितेश मेहता,डॉ.जय यादव,डॉ.नंदकिशोर पाटील, डॉ.चारुशिला सागर धुमाळ,आदींनी तपासणी करत वैद्यकीय सेवा देत उपचार केले.या शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना सचिव संजय मशिलकर यांच्या नेतृत्वाखाली ओंकार बसवंती,शिवसेना शहरप्रमुख समाधान दास,भाऊसाहेब घाडगे,किरण चांदणे,शुभम पवार,शिवाजी खराडे,प्रतीक धोंडे,कल्पेश भिलारे,प्राजू मेटकर,सुमित मामा,सायमन आर्सूड,सागर ठाकूर,आकाश महाजन,अजय पवार,प्रमोद सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
या शिबीरासाठी प्रशासनाच्यावतीने ग्राम महसूल अधिकारी विकास कांगणे,ग्रामपंचायत अधिकारी रमाकांत केवटे उपस्थित होते.

शिवसेना सचिव संजय मशिलकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना तांदुळवाडीचे सरपंच रणजितसिंह पाटील,मा.सरपंच कुबेर गवळी सह मान्यवर.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!