न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

अमळनेर नगरपरिषदेत अंतिम प्रभाग रचना जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगरपरिषदेत अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

अमळनेर : विक्की जाधव 

शहराच्या प्रभाग रचनेत अखेर अंतिम निर्णय घेण्यात आला असून दोन प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. वाडी चौक परिसरातील नागरिकांच्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सुनावणी घेतल्यानंतर आयोगाकडे अहवाल पाठविला होता. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली.

या बदलांमध्ये वाडी चौक परिसराचा प्रभाग १२ मधून वगळून प्रभाग १० मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच नदीकाठावरील बेलदार मोहल्ल्याचा काही भाग प्रभाग १० मधून वगळून नव्या प्रभाग ४ मध्ये जोडण्यात आला आहे. या फेरबदलांमुळे शहरातील मतदान केंद्रांची संख्या १०८ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने २८९ नगरपालिकांसाठी मतदार यादी कार्यक्रमही जाहीर केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून ८ ते १३ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर ७ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित होईल. याच काळात नगराध्यक्ष आणि प्रभाग आरक्षण सोडतही होण्याची दाट शक्यता आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी १ जुलै २०२५ च्या विधानसभेच्या मतदार यादीला अंतिम आधार मानण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!