न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

संतोष शिंदे यांची महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

संतोष शिंदे यांची महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

जालना/- महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाकडून समाजकार्यातील उल्लेखनीय कामगिरी व अनुभव लक्षात घेऊन येथील संतोष शिंदे यांची महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दिं.28 छत्रपती संभाजीनगर येथे परिट (धोबी) समाज मेळाव्याप्रसंगी ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बालाजी शिंदे यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. परिट (धोबी) समाजातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष करून समाजहितासाठी काम करण्याच्या अपेक्षेने ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
नियुक्तीनंतर समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संतोष शिंदे यांच्या पुढील कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजयराव देसाई, गणेश जगताप, कैलास तेलंग, शंकर बनसोडे, साईनाथ हजारे, राजेंद्र शेठ सोनवणे, सुधीर जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!