न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

वादळी वाऱ्यासह पावसाचा आहाकार रस्त्यावरील नाले आणि विहिरींच्या पाण्याची पातळी सारखीचं..

अपनी भाषा में पढ़े! Translate

वादळी वाऱ्यासह पावसाचा आहाकार रस्त्यावरील नाले आणि विहिरींच्या पाण्याची पातळी सारखीचं..

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील नाले आणि विहिरींच्या पाण्याची पातळी सारखी झालेली दिसत आहे. सततच्या पावसामुळे गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, अजून दोन-तीन दिवस पाऊस कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 प्रसिद्ध उद्योजक अमेय भाऊ मुंदडा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मार्मिक समाचार टीम.

या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, भात यासह विविध पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हातावर हात धरून बसले आहेत. शेतातील पिके वाहून गेल्याने किंवा कुजून नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. शेतात उभे असलेले सोनेमोल पीक एका रात्रीत गाडले गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी शासनाला तातडीने मदतीचे आवाहन केले असून, प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ ऑक्टोबर रोजी अमळनेरच्या इंदिरा भवनात बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शेतकऱ्यांना संबोधित करून संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांवर आणि शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ठोस भूमिका जाहीर केली जाणार आहे.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!