न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया अनोखा उपक्रम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया अनोखा उपक्रम..

 

अमळनेर : विक्की जाधव. 

पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ने राज्यभरात अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. शैक्षणिक किट, साहित्य, समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांना मोठा आधार देण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे. मुंबईतील रेडिओ क्लब येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

भविष्यातील अमळनेरचा वेध घेणारे, प्रसिद्ध उद्योजक अमेय भाऊ मुंदडा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा: मार्मिक समाचार टीम 

या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, महासचिव चंद्रमोहन पुप्पाला, शंतनू डोईफोडे, दिव्या भोसले, चेतन बंडेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अन्नामृत फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअरच्या सहकार्याने शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच भविष्य घडवणारे शस्त्र असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.महाराष्ट्रात सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आता देशभर झेप घेणार आहे. पत्रकारांसाठी आवाज उठवणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आता त्यांच्या कुटुंबीयांसाठीही सुरक्षा कवच ठरत आहे. “पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाची हमी” हा संस्थेचा संकल्प असून, देशातील प्रत्येक राज्यात हा उपक्रम पोहोचवण्याचे ध्येय संस्थेने निश्चित केले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!