श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगणात पाणी च पाणी आल्याने महादेव काशी विश्वेश्वर भगवान यांची पिंड पाण्याखाली.
सुरंगली संजीव पाटील
काशी कुंड ओव्हर फ्लो । भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील प्रसिद्ध प्राचीन तिर्थक्षेत्र श्री काशी विश्वेश्वर भगवान महादेव मंदीरात आणि परीसरात पाणी आल्याने श्री काशी विश्वेश्वर भगवान यांची लिंग पिंड पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे काशी विश्वेश्वर भगवान यांना नेहमी प्रमाणे जुई धरण ओव्हर फ्लो झाल्या नंतर नैसर्गिक जल अभिषेक होतो .तसा भगवान महादेव पाण्यात आहेत. जुई धरण ओव्हर फ्लो भरुन वाहत आहे. धरण भरल्यानंतर काशी विश्वेश्वर मंदीर सुरंगी पर्यंत धरणाचे बॅक वॉटर क्षेत्र आहे.धरण पुर्ण क्षमतेने भरल्या नंतर सुरंगली येथील काशी विश्वेश्वर मंदीरात पर्यंत पाण्याचा तुंब येतो .धरण भरल्यानंतर जुई नदी काशी विश्वेश्वर नाल्याला पुर आल्यावर पाणी पातळीत वाढ होऊन मंदीर परिसर पाण्याखाली जातो. मंदीरात पाणी गेल्याने भगवान श्री काशी विश्वेश्वर ची पिंड पाण्याखाली जाते. पुर जसा जसा कमी होतो तसा मंदिर परीसरातील पाणी ओसरते .हे दृश्य अतिशय सुंदर मनमोहक मनाला मोहून टाकते ही निसर्गाची किमया आहे.