न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध : दोषींवर कठोर कारवाईची अमळनेरात मागणी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध : दोषींवर कठोर कारवाईची अमळनेरात मागणी.

 

अमळनेर : विक्की जाधव.

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना – व्हॉईस ऑफ मिडिया, अमळनेर शाखा (जि. जळगाव) तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. पत्रकारांवरील सततचे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

निवेदनात हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, याविषयी संघटनेने संताप व्यक्त केला. पत्रकार समाज हा सत्य आणि न्यायासाठी अहोरात्र कार्यरत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात याव्यात आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून शासनाने ठोस व कडक धोरण आखावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. शासनाने तातडीने कारवाई केली नाही तर पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी मोठा संघर्ष उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. व्हॉईस ऑफ मिडिया चे प्रदेश सरचिटणीस मा. दिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद ठोके, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडण्यात आला.

यावेळी अमळनेर तालुका अध्यक्ष उमेश काटे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे, जिल्हा अध्यक्ष (साप्ताहिक विंग) संजय सूर्यवंशी, जळगाव जिल्हा संघटक जयेश काटे, जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, तालुकाध्यक्ष (साप्ताहिक विंग) अजय भामरे, शहराध्यक्ष जयवंत वानखेडे, तालुका उपाध्यक्ष गौतम बिराडे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव ईश्वर महाजन, तालुका प्रसिद्धीप्रमुख दिनेश पालवे, तसेच कार्यकर्ते विवेक अहिरराव, धनंजय सोनार, मिलिंद पाटील, विनोद कदम, राहुल बहिरम, रजनीकांत पाटील, रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, भाऊसाहेब देशमुख, शरद कुलकर्णी, किरण चव्हाण, निरंजन पेंढारे, दयाराम पाटील, भरत पाटील, प्रकाश जैन, बी. एल. पाटील, रमण भदाणे, विशाल मैराळे, प्रसाद जोशी, सोपान भवरे, दिनेश नाईक, संजय पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत निकम, भूषण महाले, शामकांत पाटील, अमित ललवाणी, तसेच इतर पत्रकार उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!