जागतिक फार्मसी दिन उत्साहात साजरा फार्मसी कॉलेज ला प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात..
अमळनेर : विक्की जाधव.
जागतिक फार्मसी दिन उत्साहात साजरा करण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. GDC Classes यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना GDC Classes तर्फे फार्मासिस्ट प्रश्न संच बक्षीस म्हणून देण्यात आला.

या उपक्रमाचे आकर्षक आणि सुबोध सादरीकरण प्रा. देवेश भावसार यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व यशस्वी पार पडण्यासाठी प्रा. अनिल बोरसे, श्री. ज्ञानेश्वर चौधरी आणि श्री. महेश सोनजे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी दिलेला उत्साही प्रतिसाद आणि शिक्षकांचा दिलेला प्रोत्साहन यामुळे स्पर्धेला अनोखी रंगत आली. या यशस्वी उपक्रमाचे कौतुक करताना खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए. निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन मा. योगेशजी मुंदडे, मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पाटील आणि प्राचार्य प्रा. डॉ. रविंद्र सोनवणे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणाऱ्या या स्पर्धेमुळे फार्मसी दिनाचे औचित्य अधिकच संस्मरणीय ठरले.