भोकरदन येथील हिंदू आक्रोश सभेत आन्वा महादेव मंदीरात गोमांस टाकलेल्या घटनेची एस.आय.टी.चौकशी करण्याची मागणी।
। भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील ।
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदीरात गोमांस टाकुन विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संशयीत म्हणून नंदकिशोर सुरेश वडगावकर आन्वा या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.परंतु वडगावकर हे निर्दोष असुन या प्रकरणात त्यांना विनाकारण अडकवण्याचा आरोप त्यांच्या पत्नी आणि हिंदूत्व वादी संघटना आणि केला आहे.या प्रकरणातील खरा आरोपी मोकाट असुन पोलीसांनी खरा आरोपीस अटक करावी .आणि आन्वा येथील घटनेची निःपक्षपाती पणे चौकशी करावी .गाय ची हत्या आणि मंदीराची विटंबना करण्यात आली आहे त्यामुळे आन्वा गावांतील नागरिक आणि हिंदूत्व वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आन्वा गावात बंद पाळण्यात आला होता.

या प्रकरणाचा निषेधार्थ सनातन सकल हींन्दु समाजाच्या वतीने भोकरदन येथील शिवाजी महाराज चौकात आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी अहिल्या नगर चे आमदार संग्राम जगताप, किर्तनकार संग्राम बापु भंडारे , महानुभव पंथाचे सुदर्शन महाराज,आन्वा येथील राधेश्याम चातुर्मासे महाराज यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आन्वा येथील महादेव मंदिरात गोमांस टाकलेल्या घटनेची एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. या घटनेतील अटक केलेल्या नंदकिशोर वडगावकर यांच्या वरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ही आ.सग्रांम जगताप यांनी केली. या प्रकरणी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन गाईची कत्तल होतांना डोळेझाक करीत असल्याचा आरोप संग्राम बापु भंडारे यांनी केला. ज्या ठिकाणी गाय ची हत्या केली जाईल तेथील पोलिस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे असा कायदा बनविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंदू मंदिराच्या विटंबना रोखण्यासाठी सरकारच्या वतीने सर्व हिंदू मंदीरात सी.सी.टीव्ही बसविण्याची मागणी संग्राम बापु भंडारे यांनी केली . आन्वा येथील घटनेत पोलीसांनी नंदकिशोर वडगावकर यांना सी.सी.टीव्ही फुटेज आधारे संशयीत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला . त्यांच्या वरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा . पोलीसांनी खरा आरोपी शोधून काढवा . आणि वडगावकर यांना ज्यां पोलिस कर्मचारी यांने मोबाईल आणण्यासाठी पाठविले आणि त्यांना या गुन्हात अडकवले त्या पोलिस कर्मचाऱ्यां ला निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या सभेत नंदकिशोर वडगावकर यांच्या पत्नी ने ही व्यासपीठावर उपस्थित राहुन माझ्या पतीला या ठिकाणी ड्युटी वर असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी मोबाईल आणण्यासाठी पाठविले त्यामुळे माझ्या पतीला या मध्ये अडवले असुन ते निर्दोष असल्याने त्यांच्या वरील गुन्हा मागे घेण्याची विनवणी केली. या वेळी आमदार संतोष भाऊ दानवे, यांची उपस्थिती होते. यावेळी हजारों घ्या संख्येने हींदू बांधव भगिनी ची उपस्थित होती . यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सदरील घटनेची एस.आय.टी.चौकशी झाली पाहिजे की नाही, वडगावकर यांच्या वरील गुन्हा मागे घेतला पाहिजे का या विषयी उपस्थित नागरीकांचे मत हात वर करुन जाणुन घेतले या वेळी हजारों हात वर झाले उपस्थित जन समुदाय कडुन एस आय टी चौकशी करण्याची आणि वडगावकर यांच्या वरील गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर, भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक भोकरदन पवन राजपुत यांच्या सह अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. सभा चालु असताना दोन वेळा रुग्णवाहिका आली रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिला.