अमळनेर रेल्वे स्थानकावर होणार उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेसचे भव्य स्वागत..
अमळनेर : विक्की जाधव.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या शुभहस्ते 19021/22 उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. या गाडीस अमळनेर येथे थांबा मिळवून देण्यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी २ वाजता अमळनेर स्थानकावर या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून, हा क्षण स्थानिकांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या निमित्ताने रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी, अमळनेर तर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेरमध्ये या गाडीला मिळालेला थांबा हा प्रवासी जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.