अमळनेर : फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

 

अमळनेर : विक्की जाधव 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी.फार्मसी कॉलेज आणि स्व. प्रा. आर. के. केले बी.फार्मसी कॉलेज, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध रक्तगटाचे सुमारे २८ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.

यासोबतच महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यात विद्यार्थ्यांनी आजच्या काळातील फार्मासिस्टचे महत्त्व सुबक आणि सर्जनशील पद्धतीने व्यक्त केले. विजेत्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिमान आणि उत्साह निर्माण झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवी व पदविका विभागातील विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष, संचालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन करत गुणवत्ता, सुस्कृंतता आणि एकजूटतेची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!