फायनल प्लॉट 123 मधील व्यापारी संकुलाला स्थानिक आमदाराचे नाव “शासनाची जागा, जनतेचा पैसा… मग आमदाराचे नाव कसे?” – भरत पवारांचा सवाल
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद मालकीच्या गट क्र. 123 मधील व्यापारी संकुलाला स्थानिक आमदाराचे नाव देण्याच्या हालचालींनी शहरात चांगलीच खळबळ माजवली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत प्रकाश पवार यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. “शासनाची इमारत, सामान्य जनतेच्या पैशातून उभारलेली मालमत्ता… मग त्यावर आमदारांचे नाव कसे चालणार?” असा थेट सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी भरत पवार यांनी नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
“आपण शासनाचे प्रतिनिधी आहात, कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तीचे प्रतिनिधी नाहीत. हे भान ठेवा,” असे सुनावत त्यांनी सार्वजनिक मालमत्तांवर राजकारणाचा शिक्का बसू देणार नाही. सदरचे नाव खोडून त्या इमारतीस एखाद्या महापुरुषाचे नाव द्यावे.
“एखाद्या आमदाराच्या नावाने इमारतींचे नामकरण करणे हा केवळ राजकीय दबाव आहे. नागरिकांची दिशाभूल करून स्वतःचा ठसा उमटवण्याचा हा डाव अजिबात खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा शासन दरबारी अमळनेर शहरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या जातील,” असेही पवार म्हटले.
या निवेदनानंतर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. नागरिकांच्याही भावना पेटल्या असून “शासनाची मालमत्ता म्हणजे राजकीय पक्षाची कार्यलय नव्हे, महाराष्ट्राचा अभिमान आहे. इमारतींवर फलक हवा तर तो फक्त महापुरुषांचाच!”