अमळनेरमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त : पोलिसांची मोठी कार्यवाही
अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क:
शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्या गांधलीपुरा भागातील एकास एलसीबी व स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री धाडसिक कारवाई करून अटक केली. ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन परिसरात पोलिसांनी घेराव घालून त्याला पकडले. त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे असा तब्बल ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
त्याची झाडझडती केली तर त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व काडतुसे मिळून आले यांनी उमर्टी येथून पिस्तुले व काडतुसे आणून विक्री केली होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शरद काकळीज, संतोष नागरे व नितीन मनोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भात यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.