हेडावे रस्त्यावर भीषण अपघात : दोन ठार, एक गंभीर जखमी
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील हेडावे रस्त्यावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका आयसर ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे विश्वनाथ हिम्मत भिल आणि ज्योतिबाई विश्वनाथ भिल (दोन्ही रा. एकरुखी) अशी आहेत. तर बाळू साहेबराव पाटील हा जखमी असून नागरिकांनी तत्परतेने मदत करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले असून त्यांच्या घरच्यांवर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.