शिरपूर महाराणा प्रताप संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळा
शिरपूर प्रतिनिधी : येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळा रविवार दि 28/09/2025 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता स्व इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल (राजपूत भवन) वरझडी रोड, शिरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इतर राजकीय, सामाजिक व उच्च शिक्षण क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाज बंधू-भगिनींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुणवंत विद्यार्थांनी व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या समाज बांधवांनी ‘महाराणा प्रताप प्रि-प्रायमरी स्कुल’, मुकेशभाई वॉटर पार्क समोर, प्रेमकमल नगर शिरपूर येथे नाव नोंदविणे संदर्भात विश्वस्त मंडळातर्फे आवाहन केले गेले होते.
गुणगौरव सोहळ्यासाठी सुरत येथील सुप्रसिद्ध उद्योगपती रविंद्र भटेसिंग राजपूत (रवि शेठ देऊर शहादा) यांचे सौजन्य लाभणार आहे.
महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेच्या सभासद बंधू भगिनींनी व समाज बांधवांनी कार्यक्रमांस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंग सरदारसिंग राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया व व्यवस्थापक प्रविणसिंग बाबुसिंग राजपूत यांनी केले आहे.
