अमळनेर येथील सकल धनगर समाज तर्फे एस .टी .आरक्षण अंमलबजावणीसाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथील सकल धनगर समाज तर्फे एस .टी .आरक्षण अंमलबजावणीसाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन.

 

अमळनेर : विक्की जाधव 

सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे एस.टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना येथील उपोषण कर्ते दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ व पाठिंबा देण्यासाठी मा. तहसीलदार साहेब रुपेश कुमार सुराणा यांना धनगर समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले.

याबाबतीत शासनाच्या शेकडो मीटिंगा झाल्या, अनेक आंदोलन झाली , तसेच बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी S.T. आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे 17 /9/ 2025 पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक ,जालना येथे उपोषणास बसले आहे . त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे .तरी या उपोषण आंदोलनाची दखल घेतली नाही .तरी आपण दोन दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटना दत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल.

या निवेदनावर बन्सीलाल भागवत, एस.सी.तेले सर, प्रदीप कंखरे, रमेशदेव शिरसाठ, आनंदा हडप सर ,एबी धनगर सर, दिलीप खांडेकर, तुषार इदे, संजय धनगर मांडळ, रमेश धनगर, दशरथ युवराज लांडगे, विजय हिवराळे, सचिन शिरसाठ, दत्तात्रय धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे,परशुराम ठाकरे धानोरा आदींच्या सह्या आहेत .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!