शासन योजनांचा लाभ घरोघरी: संजय गांधी शाखेतील कर्मचारी घेताय योजना सामान्यां पर्यंत पोचवण्यासाठी परिश्रम 

अपनी भाषा में पढ़े! Translate

शासन योजनांचा लाभ घरोघरी: संजय गांधी शाखेतील कर्मचारी घेताय योजना सामान्यां पर्यंत पोचवण्यासाठी परिश्रम 

 

अमळनेर : विक्की जाधव 

महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु. प्र. अ. येथे प्रशासनाने कौतुकास्पद पुढाकार घेतला. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज पात्र लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भरून घेण्यात आले. संजय गांधी शाखेतील कर्मचारी घेताय योजना सामान्यां पर्यंत पोचवण्यासाठी परिश्रम अपंग, विधवा, वयोवृद्ध यांसारख्या गरजू नागरिकांना दारापर्यंत जाऊन सेवा दिल्याने त्यांचा त्रास कमी झाला व शासकीय योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचल्याचा आनंद लोकांत आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. अर्ज प्रक्रिया सोपी करण्याबरोबरच, काही लाभार्थ्यांचे पगार थांबलेले असल्यास त्यांना डीबीटी प्रक्रियेद्वारे पुन्हा सुरू करण्यावरही विशेष भर देण्यात आला. त्यामुळे शासकीय योजनांबद्दल लोकांचा विश्वास वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.

अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये असे शिबिर घेऊन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेणे व त्यांचे अर्ज त्वरित भरणे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संजय गांधी शाखेतील कर्मचारी या उपक्रमासाठी गावागावात धाव घेत असून, “शासन तुमच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!