अमळनेरमध्ये चाकूच्या धाकावर घरफोडी – चाळीस हजार रोकड व सोन्याचे दागिने लुटले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरमध्ये चाकूच्या धाकावर घरफोडी – चाळीस हजार रोकड व सोन्याचे दागिने लुटले.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील अयोध्यानगर परिसरात २५ सप्टेंबरच्या पहाटे घरमालक ड्युटीला निघताच चार अज्ञात चोरट्यांनी हातात चाकू घेऊन घरात प्रवेश केला. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त करून तब्बल पाच ते सहा तोळे सोने व रुपये रोख लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना दीपक पुंडलिक पाटील यांच्या घरी घडली असून ते रेल्वेत तांत्रिक पदावर कार्यरत आहेत. पहाटे पाच वाजता ते नोकरीसाठी बाहेर पडल्यावर काही वेळातच चार जणांनी घरात प्रवेश केला. घरातील कुटुंबियांना चाकू लावून काही मिनिटांत चोरी करून चोरटे पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, तसेच हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव,यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. ठसे तज्ज्ञांना बोलावून पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!