आन्वा येथील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिरात आढळले मांसाचे तुकडे आन्वा गावात तणाव हिंदूत्व वादी संघटना आक्रमक आमदार संतोष दानवे ची भेट .
शांतता राखण्याचे आवाहन।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील। ।
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिरात शुक्रवारी 19सप्टेंबर रोजी सकाळी शिवभक्तांना मास आढळले.त्या मुळे शनिवार 20सप्टेंबर व्यापारी वर्गानी गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.या घटनेची माहिती मिळताच पारध पोलीसांनी घटना स्थळी तातडीने भेट दिली.शनीवारी दुपारी भोकरदन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण बिडवे यांनी आन्वा येथे भेट देऊन शांतता समितीची बैठक घेऊन गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना किरण बिडवे यांनी दिले. काल दिनांक 20सप्टेंबर रोजी आमदार संतोष भाऊ दानवे यांनी आन्वा येथे भेट देऊन गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.आपण आन्वा येथील घटनेवर लक्ष ठेवून आहोत असे गावकऱ्यांना सांगितले. काल रविवारी भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर , भोकरदन पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.श्वान पथाकाला पाचारण करण्यात आले.फार्न्सीक टीम ला ही पाचारण करण्यात आले.जो पर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक आन्वा येथे भेट देत नाही.पोलीसांन कडून घटनेचा तपास होउन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आन्वा गावात बंद पाळण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही पुन्हा मंदिर गेटवर मास अडकवलेले आढळुन आले आहे.काही संशयित नावे पोलीसांना देण्यात आली आहे. आता या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरा लावण्यात आला आहे.