दिलीप मालवणकरांचे लेख आचार्य अत्रेंची आठवण करून देतात !
-श्याम गायकवाड
दिलीप मालवणकर हे सडेतोड लेखन करणारे निर्भीड पत्रकार तर आहेतच तसेच सद्या लोप पावत चाललेल्या निष्ठावंतांपैकी एक दुर्मिळ कार्यकर्ते आहेत, मात्र त्यांच्या पक्षाने त्यांची दाखल घेतली नाही, त्यांची योग्यता आजच्या अनेक नेत्यांपेक्षा मोठी आहे,असे गौरवोद्गार रि पा ई नेते व पॅन्थर श्याम गायकवाड यांनी काढले.
काल सिंधू भवनच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार व शिवसैनिक दिलीप मालवणकर यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्याम गायकवाड यांनी वरील उद्गार काढले.या प्रसंगी अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, प्रा. व्ही व्ही पाटील, डॉ. जानू मानकर हे उपस्थित होते.
दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांनी दिलीप मालवणकर हे माझे पत्रकारितेतील गुरु असून त्यांच्या अजब लोकशक्ती मधून मी पत्रकारितेचे धडे गिरवले, असे नमूद करून दिलीप मालवणकर हे कोणालाही न घाबरता स्पष्ट लेखन करणारे निर्भीड पत्रकार आहेत, असे गौरवोद्गार काढले. या वेळी डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या संदेशपर चित्रफितीत मालवणकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये सांगितली.
या समारंभ निमित्त विविध कला सदर करण्यात आल्या. गायन, वादन व नृत्य अविष्कार पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. यात श्रीमती मीनल साळकर, देवांशी भंगाळे, अरुण म्हात्रे, विलास देशपांडे, कैलासनाथ पाटील, माधवी भिडे, सुनिल बानोडकर यांनी गायन सादर केले, तर कृष्णा साठे व आयुष्य गागडे यांनी सुश्राव्य बासरी वादन केले. श्रीमती मीनाक्षी काळे, कु. हर्षला रेवणकर यांनी दिलखेचक भरत नृत्य व लावणी सादर केले. नरेश चोडणकर यांचे नाट्य गीत व प्रशांत चोडणकर यांचे तबला वादन अप्रतिम होते.अश्या त्रिवेणी कलांचे प्रेक्षक व्ही श्रोत्यांना येथे दर्शन झाले. या प्रसंगी श्रीमती सुलभा गायकवाड, आमदार तसेच अनेक माजी नगरसेवक विविध सामाजिक कार्यकर्ते , राजकीय पक्षांचे पदाधिकारी,साहित्यिक संस्थांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. प्रल्हाद कोलते यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती पुष्पा पाटील मॅडम यांनी ओघवत्या भाषेत पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री रामेश्वर गवई यांनी आभार प्रदर्शन केले.