सुरंगली जि.प.प्राथमिक शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांना निरोप नविन रुजु झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ ।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील॥ भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील जि.प.प्रा.शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांना विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यासाठी तसेच नव्याने सुरंगली येथे जि.प.शाळेवर बदलुन आलेल्या रुजु झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोळुंके सर, मुख्याध्यापक राठोड सर, गांगे सर, अंभोरे सर, या शिक्षकांना बदली झाल्या मुळे गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निरोप देण्यात आला.शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच शाळेवर नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अरुण विठोबा बावस्कर, पदवीधर शिक्षक सुदामा पांडुरंग अनमुलवाड सर, सहशिक्षिका श्रीमती कालभिले बावस्कर, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कृष्णा बावस्कर सर, आणि गिरी सर शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विष्णु साक्रुबा दांडगे, संतोष मारोती काळे सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष गणेश एकनाथ वानखेडे . काशी विश्वेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अवचितराव सपकाळ, निवृत्ती येवले, गावीत सर, यांची उपस्थिती होती.
