प्रताप महाविद्यालयाची विजयगर्जना – पाच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून निवड
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरने आणखी एक यशोगाथा रचली आहे. महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध शासकीय पदांवर आपली निवड पक्की केली आहे.

निवड झालेल्यांमध्ये कविता गोकुळ बिर्हाडे (धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई), भाग्यश्री बापू महाजन (आदिवासी विकास विभाग, नाशिक), राजश्री गणेश सोनवणे (महसूल सहाय्यक, सहकारी संस्था नाशिक विभाग), सचिन दर्यावसिंग गिरासे (लेखापाल, लेखा व कोषागार विभाग, नागपूर) व शामकांत ईश्वर साळुंखे (महसूल सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे) यांचा समावेश आहे.या यशामागे विद्यार्थ्यांचा परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि करिअर कौन्सिलिंग सेंटरचे मार्गदर्शन ठळकपणे दिसून आले. महाविद्यालयाचे प्राध्यापक, संचालक मंडळ तसेच विविध मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.