अमळनेर पोलिसांची कामगिरी हद्दपार केलेला आरोपी ताब्यात.
अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क
शहरातील हद्दपार इसम मौज्जम शेख शब्बीर (वय २०, रा. गांधलीपुरा, अमळनेर) यास पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथकाने कारवाई करत त्याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पो.उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रविण मांडोळे व पो.ना. राहुल कोळी यांनी केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे.