ब्रेकिंग न्यूज : अमळनेरमध्ये दगडाने ठेचून ३८ वर्षीय तरुणाचा खून, आरोपी ताब्यात
अमळनेर : मार्मिक न्यूज नेटवर्क
शहरातील पैलाड भागात २१ सप्टेंबरच्या रात्री थरारक खुनाची घटना उघडकीस आली आहे. मुकेश भिका धनगर (३८) याचा निखिल विष्णू उतकर (४५, रा. करंजा पंचवटी, नाशिक) याने दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केली आहे.
रात्री उशिरा हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली झालेल्या वादातून हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.