सेवा पंधरवाडा उपक्रम युद्धपातळीवर रांबवा – उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांचे निर्देश

अपनी भाषा में पढ़े! Translate

सेवा पंधरवाडा उपक्रम युद्धपातळीवर रांबवा – उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांचे निर्देश

 

अमळनेर : विक्की जाधव.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. या सेवा पंधरवाड्याचे आयोजन तीन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १७ ते २२ सप्टेंबर पाणंद रस्ते विषयक मोहीम, दुसऱ्या टप्प्यात २३ ते २७ सप्टेंबर सर्वांसाठी घरे या उपक्रमाशी संबंधित पूरक कार्यक्रम तर तिसऱ्या टप्प्यात २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत.

शेतरस्त्यांचे संमतीपत्र, रस्ता अदालत, मोजणी व सीमांकन, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमन, गायरान जमिनीवरील आरक्षणाशी संबंधित कार्यवाही अशा अनेक बाबींसह स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रम राबवले जाणार आहेत. या बैठकीस नायब तहसीलदार, भूमिअभिलेख अधीक्षक, मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!