16 वर्षाची अल्पवयीन गर्भवती प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

16 वर्षाची अल्पवयीन गर्भवती प्रकरणात ट्रान्सफर गुन्हा दाखल

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ गावात समाजाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. गावातील आशा वर्कर नलिनी कैलास गवळी या नियमित गरोदर मातांची नोंदणी करत असताना भवानी नगर परिसरातील एका इसमाने आपल्या मुलीबाबत माहिती दिली. तपासाअंती उघड झाले की ती अल्पवयीन मुलगी (वय १६) पाच महिन्यांची गर्भवती आहे.

याबाबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. चौकशीत तिने कबूल केले की तिचे लग्न एक वर्षापूर्वी भिलाली (ता. अमळनेर) येथील एका युवकासोबत पालकांनी लावून दिले होते. लग्नानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध आल्याने ती गर्भवती झाल्याचे धक्कादायक सत्य तिने उघड केले.

या प्रकरणी आशा वर्करने मुलीच्या पालकांना सोबत घेऊन मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी समाधान सोनवणे याच्याविरोधात पोक्सो कायदा कलम ४, ८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(१), ६४ (२)(एल) अन्वये गुन्हा दाखल केला असून मारवाड वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!