महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरून जनतेत संताप; विधेयक रद्द करण्याची अमळनेरात मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरून जनतेत संताप; विधेयक रद्द करण्याची अमळनेरात मागण

 

अमळनेर : विक्की जाधव.

‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०१४’ (कायदा) राबविण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांविरोधात नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीविरोधी व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या कायद्याच्या आडून शासनावर टीका करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना, कार्यकर्त्यांना व नागरिकांना अटकसत्रे, दडपशाही व खोट्या कारवायांना सामोरे जावे लागेल. समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प बसवण्यासाठी हा कायदा हुकुमशाहीचे हत्यार ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विविध संघटना व विरोधी पक्षांनी देखील त्याचा तीव्र निषेध केला आहे. सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!