भिगवण येथे रील स्टार प्रतीक शिंदे यांच्या नवीन फॉर्च्यूनर चा अपघात; अपघातात कोणतीही जीवित हानी नाही

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथे रील स्टार प्रतीक शिंदे यांच्या नवीन फॉर्च्यूनर चा अपघात; अपघातात कोणतीही जीवित हानी नाही

(निलेश गायकवाड)

भिगवण येथे रिल स्टार प्रतीक शिंदे यांच्या नवीन फॉर्च्यूनर गाडीचा अपघात झाला. या अपघातात तब्बल तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..

फिर्यादी निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, वय 35) हे आपल्या हुंदाई क्रेटा (एम.एच. 45 ए.यु. 9779) गाडीतून प्रवास करत होते. सायं. पाचच्या सुमारास मदनवाडी, सकुंडे वस्ती जवळील ऑस्करवाडी मिसळ हॉटेलसमोर, मागून भरधाव आलेली टोयोटा फॉर्च्यूर्नर (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरात धडकली.

ही गाडी रीलस्टार प्रतीक शिंदे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर, वय 24) चालवत होते . धडकेचा जोर एवढा होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर (एम.एच. 12 एक्स एम. 3816) वर आदळली. काही क्षणांत तीनही गाड्या एकमेकांना आपटून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या.

या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेवरून भिगवण पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 229/2025 दाखल करण्यात आला आहे. प्रतीक शिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324 (4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उगले (ब. नं. 2637) करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!