मदनवाडी येथील कु. सानिका आप्पासो कोकरे बेपत्ता असल्याने पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल…
(निलेश गायकवाड)
मदनवाडी येथील हनुमान मंदिरा शेजारी असणारे आप्पासो सुखदेव कोकरे यांनी आपली मुलगी कु. सानिका आप्पासो कोकरे वय 21 वर्ष बेपत्ता झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमारी सानिका आप्पासो कोकरे 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ही शेजारी बसायला जाते असे सांगून घरातून कुठेतरी निघून गेली आहे तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ते कुठे मिळून आली नाही म्हणून मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
मिसींग व्यक्ती वर्णन- शिक्षण-बी ए, वर्ण गोरा, केस काळे, अंगात नेसणीस पंजाबी ड्रेस प्रिंटेड काळा पिवळा कुर्ता, पँट काळ्या रंगाची, पायात चप्पल, बोली भाषा मराठी, हिंदी
पुढील अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशन करत आहे.